सहकाऱ्याच्या गोळीबारात चार सीआयएसएफ जवानांचा मृत्यू, जम्मू-कश्मीरमधील घटनेने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) हादरवून टाकणारी घटना मंगळवारी जम्मू-कश्मीरमध्ये घडली. येथील कठुआ जिह्यात वीज प्रकल्पावर तैनात असलेल्या एका सीआयएसएफ जवानाने केलेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला. यात एका सहाय्यक कमांडंटचाही समावेश आहे.

हिमाचल प्रदेशच्या सीमेजवळील बसोली येथील मशका गावातील ‘सेवा-3’ वीज प्रकल्पात ही घटना घडली. दोन जवानांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यातील एकाने संतापातून आपल्या सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात एकूण चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहाय्यक कमांडंट अंकित कुमार पांडे, कॉन्स्टेबल रफिक अहमद, कॉन्स्टेबल संदीप कुमार आणि सब-इन्स्पेक्टर लक्ष्मण सिंग यांचा समावेश आहे. आरोपी कॉन्स्टेबल अभिदेश कुमार सिंह याला अटक करण्यात आली आहे.

लक्ष्मण सिंग
संदीप कुमार
अंकित पांडे
रफिक अहमद