सारथी संस्थेला 122 कोटी मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या बांधकामासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ला 122 कोटी 34 लाख तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधापृष्ण विखे-पाटील यांनी दिली. सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सामाजिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मराठा समाजातील 500 विद्यार्थी आणि 500 विद्यार्थिनी या क्षमतेच्या आठ वसतिगृहांच्या उभारणीचे काम पूर्णत्वास जात आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील अशा दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.