
वादळी वारे आणि खराब हवामानाचा फटका मंगळवारी सायंकाळी मुंबईतील विमानसेवेला बसला. मुंबईकडे येणारी आठ विमाने ऐनवेळी वळवावी लागली. ही सर्व विमाने सूरत विमानतळावर उतरवण्यात आली असून या विमानांमध्ये 12 हजार 55 प्रवासी होते, अशी माहिती देण्यात आली. यात इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचा समावेश होता. दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, भोपाळ, गोवा आणि तिरुचिरापल्ली येथून ही विमाने मुंबईत येणार होती.
































































