सर्वाधिक मध्य प्रदेशात; अवघ्या 9 महिन्यांत 134 वाघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, यंदा अवघ्या नऊ महिन्यांत देशात 134 वाघांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मध्य प्रदेशात 44, तर महाराष्ट्रात 27 वाघांचा समावेश आहे. गेल्या संपूर्ण वर्षात देशात 174 वाघांचा मृत्यू झाला होता. वर्ष संपण्यास तीन महिने बाकी असतानाच यंदाची संख्या त्या आकडय़ाच्या जवळ पोहोचली आहे.

पॅमेरा ट्रप, जीपीएस, ड्रोन आणि डिजिटल मॉनिटरिंगच्या माध्यमातून जंगलावर नजर ठेवली जात असली तरी या यंत्रणा प्रत्यक्ष गस्तीची जागा घेऊ शकत नाहीत, हे पुन्हा एकदा वाघांच्या वाढत्या मृत्यूच्या आकडेवारीने स्पष्ट झाले. रात्रीच्या वेळी जंगलात गस्त, संवेदनशील भागांची तपासणी, संशयास्पद हालचालींचा माग आणि शिकारींच्या टोळ्यांवर नजर यासाठी वन कर्मचाऱयांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. वरिष्ठ वनाधिकाऱयांनीही अधूनमधून गस्तीत सहभागी होणे अपेक्षित आहे. वाघाच्या मृत्यूनंतर आपसी लढाई, नैसर्गिक कारणे किंवा वृद्धत्व यापैकी एखादे कारण पुढे करून प्रकरण निकाली काढण्याची प्रवृत्तीही वाढली आहे.