दुबईहून लंडनला जाणाऱ्या विमानात वैद्यकीय आणीबाणी, फ्रँकफर्टकडे आपत्कालीन लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुबईहून लंडनला जाणाऱ्या एमिरेट्सच्या विमानात वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली. यामुळे विमानाचे फ्रँकफर्टमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान फ्रँकफर्टला पोहोचण्यापूर्वीच तिथे वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली होती. विमान फ्रँकफर्ट विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आणि त्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्या प्रवाशाला विमानातून खाली उतरवण्यात आले.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एमिरेट्सचे EK31 हे विमान दुबईहून लंडनला चालले होते. प्रवासादरम्यान अचानक एका प्रवाशाची प्रकृती बिघडली. यामुळे वैमानिकाने विमान फ्रँकफर्टकडे वळवले. फ्रँकफर्टमध्ये विमान उतरल्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्या प्रवाशाला हलवण्यात आले.