
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. अंकिता भक्त, कीर्ती शर्मा आणि कुमकुम अनिल मोहोड या त्रिकुटाने अंतिम सामन्यात बलाढ्य दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव केला. विशेष म्हणजे हिंदुस्थानने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
दक्षिण कोरियाविरुद्धची अंतिम लढत सुरुवातीपासूनच चुरशीची झाली. पहिल्या दोन एंडनंतर दोन्ही संघ 1-1 आणि त्यानंतर 2-2 अशा बरोबरीवर होते. तिसऱ्या एंडमध्ये हिंदुस्थानने निर्णायक आघाडी मिळवली. कीर्ती शर्माने सुरुवातीलाच अचूक 10 गुणांचा निशाणा साधत हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी दबावाच्या परिस्थितीतही सातत्यपूर्ण कामगिरी केली.
STORY | Archery at Asian Games: Indian women’s recurve team clinches historic gold
Indian women’s recurve archery team produced a sensational performance to clinch its maiden Asian Games gold medal, defeating the mighty South Korea in the final here on Friday.
READ:… pic.twitter.com/KlIZWiWnBu
— Press Trust of India (@PTI_News) October 2, 2026
सुवर्णपदक निश्चित करण्यासाठी अखेरच्या क्षणी कुमकुम मोहोडवर मोठी जबाबदारी होती. कीर्ती आणि अंकिताने प्रत्येकी 9 गुण मिळवल्यानंतर कुमकुमने परफेक्ट 10 साधत हिंदुस्थानच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, हिंदुस्थानने यापूर्वी महिला रिकर्व्ह सांघिक प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला नव्हता. त्यामुळे हे सुवर्ण हिंदुस्थानसाठी ऐतिहासिक ठरले आहे. यापूर्वी उपांत्य फेरीत भारताने चीनचा 5-1 असा पराभव केला होता.
15 सुवर्णपदके हातातून निसटली; हिंदुस्थानी पथकाचा शतक महोत्सव साजरा होण्याची शक्यता कमीच



























































