दिवेआगर समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, पोहण्याचा मोह जिवावर बेतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज घडली. 11वी आणि 12 वीचे हे सर्व विद्यार्थी होते. समुद्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने या विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला असून या घटनेनंतर आळंदीवर शोककळा पसरली आहे.

आळंदी येथील विनर्स अॅपॅडमीमध्ये शिकणारी 25 मुले, 17 मुली आणि सहा शिक्षक असे एकूण 48 जण खासगी बसने निसर्गरम्य दिवेआगार येथे आले होते. येथील समुद्रकिनाऱ्यावर त्यांची बस येताच सर्व विद्यार्थी खाली उतरले आणि थेट समुद्रकिनाऱयावर मौजमजा करण्यासाटी गेले. विस्तीर्ण किनारा.., थंडगार वारा आणि वातावरण बघून मुले अतिशय खूष झाली होती. किनाऱयावर फिरत असतानाच आठ विद्यार्थ्यांना समुद्रात पोहण्याचा मोह झाला. ते खोल समुद्रात जाऊ लागले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. जिवाच्या आकांताने ते ओरडत होते. मात्र लाटांसोबत ते समुद्रात ओढले गेले.

मदतीसाठी धाव

या घटनेची माहिती समजताच दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी व सहकाऱयांनी धाव घेतली. लाईफगार्ड, स्थानिक नागरिक तसेच बचाव पथकाने बुडालेल्या मुलांचा शोध घेतला. दिवेआगर येथील महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या बोटीच्या सहाय्याने मुलांना समुद्रकिनाऱ्यावर आणले. या सर्वांचा बुडून मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बोर्ली पंचायतन येथील प्राथमिक आरोग्य पेंद्रात आणले आहेत.

सागरी सुरक्षा रक्षक नेमा

समुद्रात बुडून आठ विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू ही दिवेआगारवासीयांसाठी धक्कादायक घटना आहे. या ठिकाणी सरकारने त्वरीत पुरेसे सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी सरपंच विजय तोडणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. दहा वर्षांपूर्वी येथे सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. पण त्यांना केवळ दोन हजार एवढेच मानधन देण्यात आले. नंतर तेही बंद झाल्याने सुरक्षा रक्षकांची आजतागायत कमतरता आहे.

मृतांची नावे

यश वानखेडे, सोहम भांडवलकर, तन्मय वहिले, काwस्तुभ दौंड, पैवल्य वासनकर, राजवीर वहिले, प्रणव बनसोडे, सुमित अहिरे अशी मृत मुलांची नावे आहेत. आळंदीमधील मुलांच्या पालकांना ही दुर्घटना समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रात्री उशीरा हे पालक दिवेआगार येथे दाखल झाले. श्रीवर्धनचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर, उपविभागीय अधिकारी महेश पाटील तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी पालकांच्या संपका&त असून त्यांना सर्वतोपरी मदत करीत आहेत.