
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर प्रादेशिक युनिटने तीन दिवसांत केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांत आंतरराज्यीय अंमली पदार्थ आणि वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश केला. 27 सप्टेंबरला राजधानी एक्स्प्रेसमधून 1.312 किलो अॅम्फेटॅमिन, किंमत 1.05 कोटी, जप्त करण्यात आले. या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली. त्यानंतर 29 सप्टेंबरला गोंदिया जिह्यात बिबटयाचे कातडे जप्त करून तस्करीशी संबंधित दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. बिबटय़ा वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या अनुसूची-1 अंतर्गत संरक्षित आहे. जप्त कातडे आणि दोन्ही संशयितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी उत्तर देओरिया वनपरिक्षेत्र अधिकाऱयांकडे सोपविण्यात आले.























































