Asian Games 2026 – 44 वर्षांची प्रतीक्षा संपली, हॉकीत महिला संघाने जिंकले सुवर्ण, ऑलिम्पिकचे तिकीटही पक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने चीनचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आणि 44 वर्षांची प्रतीक्षा संपवली. अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या महिला संघाने दमदार खेळ करत चीनचा 1-0 असा पराभव केला. या विजयामुळे 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये महिला संघाला थेट प्रवेश मिळाला आहे.