Chandrapur News – वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी, पोंभूर्णा तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना चंद्रपूरमधील पोंभूर्णा तालुक्यातील विहीरगाव-घनोटी येथे घडली. या हल्ल्यात गुराखी जखमी झाला आहे. साईनाथ मांडवगडे असे जखमी गुराक्याचे नाव असून तो घनोटी येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगत असलेल्या शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.