पंजाब सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, बीएसएफकडून दोघांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबच्या तरनतारन सेक्टरमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर बीएसएफने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. घुसखोरांना रोखण्यासाठी सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात दोन घुसखोर ठार झाले. एक जण पाकिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाला. तरनतारनच्या बीओपी राजोके परिसरात मध्यरात्री 12.30 च्या सुमारास ही घटना घडली.

बीएसएफच्या माहितीनुसार, तीन व्यक्ती पाकिस्तानमधून बेकायदेशीरपणे हिंदुस्थानच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होत्या. सुरक्षा यंत्रणांनी सुरुवातीला इशारा दिला, परंतु त्यांनी इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत ते पुढे सरकत राहिले. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोन घुसखोर ठार झाले तर एक जण पळून गेला.