बॉम्बे आर्ट सोसायटीची आज पंचवार्षिक निवडणूक; ‘कलावारसा’ विरुद्ध ‘संकल्प’ पॅनेलमध्ये लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’ या प्रतिष्ठित कलासंस्थेची पंचवार्षिक निवडणूक शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. मुख्य लढत ‘कलावारसा’ आणि ‘संकल्प’ पॅनेल यांच्यात होणार आहे. बॉम्बे आर्ट सोसायटी, वांद्रे रेक्लेमेशन येथे दुपारी १.३० ते सायंकाळी ६ दरम्यान मतदान होणार असून, उद्या सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येतील. ‘कलावारसा’ हे बॉम्बे आर्ट सोसायटीमधील विद्यमान पॅनेल आहे. त्यांच्यासमोर ‘संकल्प’ पॅनेल निवडणूक लढवत आहे. सोसायटीचे तीन हजारांहून अधिक मतदार आहेत.

उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे :

  • ‘कलावारसा’ पॅनेल : राजेंद्र पाटील (अध्यक्ष), प्रा. सुरेंद्र जगताप (सेक्रेटरी), अजिंक्य चौलकर (खजिनदार). समिती सदस्य : प्रा. नरेंद्र विचारे, प्रा. अनिल नाईक, विक्रांत मांजरेकर, श्रीकांत कदम, माधवी गांगण, सुजाता आचरेकर, गणपत भडके.

  • ‘संकल्प’ पॅनेल : विजय राऊत (अध्यक्ष), डॉ. गजानन शेपाळ (सेक्रेटरी), भावना सोनावणे (खजिनदार). समिती सदस्य : विठ्ठलराव लोखंडेकर, प्रा. नंदकिशोर मानकर, प्रा. रमेश भोसले, प्रा. संजय साबळे, दीपक पाटील, डॉ. मीनल राजुरकर, अश्विन कदम.