सोने आठवड्यात 4 हजारांनी स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या आठवडाभरात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 24 पॅरेट सोन्याच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाल्याने सोन्याचा दर 1 लाख 52 हजारांवरून 1 लाख 48 हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. सोन्याप्रमाणे चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. एक किलो चांदी 11 हजार 521 रुपयांनी स्वस्त होऊन 2 लाख 21 हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे. यापूर्वी, गेल्या आठवडय़ात म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी तो 2.32 लाख रुपयांवर होता. आज गांधी जयंतीनिमित्त बाजारात सोन्याचे नवे दर ठरले नाहीत. मुंबईत सोन्याचा दर 1 लाख 49 हजार रुपये प्रति तोळा आहे.