
आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाने इतिहास रचला. अंकिता भकत, कुमकुम अनिल मोहोद आणि कीर्ती शर्मा या त्रिकुटाने अंतिम फेरीत दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
प्रथमच शिरपेचात मानाचा तुरा
महिला सांघिक रिकर्व्ह प्रकारात हिंदुस्थानने अखेर एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. 2010 च्या ग्वांगझू आणि 2022 च्या हांगझोऊ स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्यानंतर हिंदुस्थान संघाने 2026 मध्ये इतिहास रचला. या क्रीडा प्रकारात दीर्घकाळापासून दक्षिण कोरियाचे वर्चस्व राहिले होते; मात्र हिंदुस्थानने त्यांचा हा दबदबा मोडून काढत या स्पर्धेत देशासाठी पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकले.


























































