
देशात 15 ऑक्टोबरपासून दोन हजार रुपयांवरील यूपीआय पेमेंटवर 0.4 टक्के एमडीआर लागू होणार आहे. परंतु, त्याआधीच देशात यूपीआय व्यवहारात घट झाली आहे. यूपीआयवरील व्यवहारांच्या संख्येत सप्टेंबरमध्ये ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 1.8 टक्क्यांची घट झाली. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये यूपीआयच्या माध्यमातून 2,407 कोटी व्यवहार झाले. ऑगस्टमध्ये ही संख्या 2,450 कोटी होती.
यूपीआय व्यवहारांचे एपूण मूल्यही सप्टेंबरमध्ये 1.5 टक्क्यांनी घटून 29.37 लाख कोटी रुपयांवर आले. ऑगस्टमध्ये हे मूल्य 29.82 लाख कोटी रुपये होते. नॅशनल पेमेंट्स का@र्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) या प्रणालीचे संचालन करते. दरम्यान, सप्टेंबरमध्ये व्यवहारांच्या संख्येत मासिक घट दिसत असली तरी दिवसाला होणाऱया सरासरी व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये 31 दिवस असल्याने त्या महिन्यात एपूण व्यवहारांची संख्या तुलनेने अधिक राहिली. सप्टेंबरमध्ये 30 दिवस असल्यामुळे एपूण व्यवहार कमी दिसत आहेत. सप्टेंबरमध्ये दररोज सरासरी 80.2 कोटी यूपीआय व्यवहार झाले, तर ऑगस्टमध्ये हा आकडा 79.1 कोटी होता. एनपीसीआयद्वारे चालविल्या जाणाऱया इमिजिएट पेमेंट सर्व्हिसेस (आयएमपीएस) प्रणालीवर सप्टेंबरमध्ये 35.40 कोटी व्यवहार झाले. या व्यवहारांचे एपूण मूल्य 7.05 लाख कोटी रुपये होते. रिझर्व्ह बँकेच्या रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) प्रणालीवर सप्टेंबरमध्ये 3.25 कोटी व्यवहार झाले. या व्यवहारांचे एपूण मूल्य 235.71 लाख कोटी रुपये होते.

























































