
पैठण शहरात आज दुपारी एसटी बस व दुचाकीच्या जोरदार धडकेत दोघा तरुणांसह चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. आगरनांदूर येथील हे दोन्ही साडू पैठणला कपडे खरेदी करून परत जात असताना हा भीषण अपघात झाला. नाका टू नाका मार्गावर असलेल्या चव्रेश्वरी दवाखान्याच्या समोर मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला. दुपारी तीन वाजता एम.एच. 06 बी. डब्ल्यू. 4369 क्रमांकाची शेवगाव ते छत्रपती संभाजीनगर जाणारी बस पैठण बस स्थानकाकडे येत होती. अशोक भालेराव व कृष्णा गायकवाड हे दोघे 2 वर्षांच्या चिमुकलीसह आगरनांदूर या गावाकडे निघाले होते. शहरातील मुख्य गजबजलेल्या रस्त्यावरच दुचाकी थेट एसटी बसवर समोरासमोर धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, तिघेही जागीच ठार झाले. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.




























































