
‘जनरल स्टोअर’ दिवसरात्र खुले ठेवण्यास प्रतिबंध करणारा कोणताही सरकारी जीआर अथवा आदेश नाहीत, अशी माहिती पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. त्याची नोंद करून घेत 24 तास खुले असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानावर कारवाई न करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.
पुण्यातील एक दुकानदाराने ही याचिका केली होती. रात्री 10 किंवा 11 नंतर दुकान बंद ठेवण्याची सक्ती पोलीस त्याच्यावर करत होते. मात्र ‘जनरल स्टोअर’ आठवडय़ाचे सातही दिवस 24 तास सुरू ठेवता येईल, असे राज्य शासनाचे फर्मान आहे. तेव्हा पोलिसांची सक्ती अयोग्य आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.
न्या. सुमन शाम व न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याबाबत योग्य ती माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. किराणा मालाचे दुकान 24 तास खुले ठेवण्यास मनाई करणारा राज्य शासनाचा कोणताच जीआर किंवा आदेश नाहीत. दुकान 24 तास खुले असल्याने त्याची तक्रार कोणत्याच स्थानिक नागरिकाने केलेली नाही, असे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले. त्याची न्यायालयाने नोंद करून घेतली. हे दुकान 24 तास सुरू ठेवण्यावर कायद्यानुसार कारवाई करता येईल. अन्यथा अन्य कोणत्याही प्रकारे पोलीस या दुकानावर कारवाई करू शकत नाहीत, असे न्यायालायने आदेशात नमूद केले.
जबरदस्ती अयोग्य
राज्य शासनाचा कोणताही जीआर अथवा निर्देश नसल्यास किराणा मालाचे दुकान रात्री 11 नंतर बंद करण्याची जबरदस्ती पोलिसांनी करणे अनधिकृत व आधारहीन आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
दरम्यान, पैठण पोलिसांनी तत्काळ अपघात स्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका पाचारण करून मृतदेह पैठणच्या शासकीय वैद्यकीय आरोग्य प्रशिक्षण केंद्रात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त दुचाकी व बस ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला.




























































