निर्मला सीतारामन यांच्या भाषणावेळी गोंधळ, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशातील दौऱयावेळी पेंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणादरम्यान स्थानिकांनी आणि शेतकऱयांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे भाषण मध्येच थांबवण्याची वेळ त्यांच्यावर आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘ग्लोबल हॉर्टिकल्चर हब’ आणि ‘इंडियन स्कूल ऑफ अॅग्रीकल्चर’च्या पायाभरणी समारंभासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिह्यातील मदनपल्ले येथे दाखल झाल्या होत्या. त्या भाषण करत असताना उपस्थितांनी गोंधळ घातला. त्यांनी उपस्थितांना शांत राहण्याचे आवाहन केले तरीही शांत राहत नसल्यामुळे सीतारामन यांना भाषण थांबवावे लागले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंचावरून हस्तक्षेप करत गर्दीला शांत राहण्याचे आवाहन करावे लागले.