
चोरट्यांनी लांबवलेल्या व हरवलेल्या मोबाईल फोनचा मुंबईसह देशभरात तपास करून कस्तुरबा पोलिसांनी 100 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत व तक्रारदारांना परत करण्यास सुरुवात केली आहे.
भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने सुरू केलेल्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (CETR) या डिजिटल पोर्टलचा वापर करून मुंबईच्या कस्तुरबा पोलिसांना मुंबईसह देशभरात 100 मोबाईल पह्न हस्तगत करण्यात यश आले आहे. यातील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 18 तक्रारदारांना उपायुक्त गजानन राजमाने यांच्या हस्ते चोरीला गेलेले मोबाईल परत करण्यात आले आहेत.
तक्रारदारांचे चोरीस गेलेले मोबाईल परत मिळविण्यासाठी CETR पोर्टलचे काम पाहणारे पोलीस उपनिरीक्षक मयूर पाटील तसेच महिला पोलीस शिपाई काजल चौगुले, अहिरे, बोबडे यांनी विशेष परिश्रम घेतले. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त शशि कुमार मीना, उपायुक्त गजानन राजमाने, एसीपी जयराज ननावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
श्रीमती बबाबाई शांताराम कदम (70) या वृद्धेचे मंगळसूत्र पळविणाऱ्या एका महिलेला कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी 24 तासांत अटक करून वृद्धेचे चोरीला गेलेले मंगळसूत्र हस्तगत केले आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक योगेश पवार, राहुल पाटील, जनार्दन शिंदे तसेच पोलीस हवालदार मुजावर, सवळी, पुजारी, पह्पसे, सकपाळ, कुटे आदी अंमलदारांनी भाग घेतला.




























































