
निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत आणि मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR) संदर्भात आज दिल्लीत विरोधी पक्षांचे आंदोलन सुरू झाले आहे. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी यादव यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपवर जोरदार टीका केली. ‘देशासाठी लढणाऱ्यांना अटकेची भीती नसते’, असे म्हणत त्यांनी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली.
अखिलेश यादव म्हणाले, “जे देशासाठी लढतात, त्यांना अटकेची भीती नसते. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा, यावर देशाचे एकमत आहे.” यावेळी त्यांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या संकल्पनेवरही प्रश्न उपस्थित केला. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ची चर्चा करणाऱ्यांचा हेतू निवडणुका एकदाच घेऊन पुढील निवडणुकांची गरजच उरणार नाही, असा असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला. त्यांच्या मते, निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करूनही त्यातून सुटण्याचा मार्ग तयार करण्याचा हा प्रयत्न आहे.
जो देश की ख़ातिर हैं लड़ते
वो गिरफ़्तारी से नहीं हैं डरतेBJP ही CEC है।
देश का एकमत, CEC दे त्यागपत्र!
‘ONE NATION, ONE ELECTION’ की थोथी बात करनेवालों का असली मंसूबा और ‘चंडीगढ़ी चाल’ ये है कि एक बार में ही चुनाव कराकर सब निपटा दो, बार-बार घपला करने की ज़रूरत ही न पड़े। घपला-घोटाला जितनी कम बार होगा, पकड़े जाने की आशंका भी उतनी ही कम होगी।
दरअसल ONE NATION, ONE ELECTION की जगह, इन भाजपाइयों को कहना चाहिए ‘ONCE CORRUPTION, ONCE ELECTION’.
मतलब अब केवल एक और बार ही चुनाव करवाने की साज़िश है, फिर कभी चुनाव होगा ही नहीं।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) October 6, 2026
दिल्लीत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मंगळवारी आंबेडकर चौकात ५० हून अधिक कार्यकर्ते एकत्र आले आणि निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी दिल्लीत ‘लोकशाही वाचवा मोर्चा’आयोजित केला होता. पोलिसांनी हा मोर्चा रोखल्यानंतर अखिलेश यादव यांना ताब्यात घेण्यात आले. ही माहिती गोरखपूरमध्ये पोहोचताच सपा कार्यकर्ते आंबेडकर चौकात जमले. सपा नेत्यांच्या म्हणण्यानुसार, अखिलेश यादव यांना दिल्लीत ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ गोरखपूरमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीशी संबंधित मुद्द्यांवर पक्ष कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली.




























































