
अणुशक्ती नगर येथे मुंबई बँकेची नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे. या भागात शाखा नसल्याने ग्राहकांना गोवंडी येथे जावे लागत होते. त्या ग्राहकांची गैरसोय आता दूर झाली आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत नव्या शाखेचे उद्घाटन झाले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, संदीप घनदाट, विठ्ठल भोसले, जिजाबा पवार बँकेचे कार्यकारी संचालक संदीप सुर्वे, बीएआरसीचे पदाधिकारी विवेक डोळस आदी उपस्थित होते. मच्छिमार बांधव हे मूळ मुंबईकर आहेत. मच्छिमार व कष्टकऱ्यांसाठी आगामी काळात मुंबई बँक योजना आणणार, अशी घोषणा यावेळी दरेकर यांनी केली.



























































