इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाळवा तालुक्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

शार्दुल पाटील (21) आणि प्रथम पाटील अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी पीडित विद्यार्थीनी बाहेरच्या जिह्यातून शिक्षणासाठी वाळवा तालुक्यात आली आहे. ती ईश्वरपूरमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षण घेते. शुक्रवारी सकाळी संशयित शार्दुल व प्रथम पाटील यांनी पीडितेला ईश्वरपूर ते कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेले. तिला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले. तिच्या इच्छेविरुद्ध दोघांनी जबरदस्तीने अत्याचार केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित शार्दुल पाटील याला अटक केली. तर प्रथम पाटील स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.