मराठवाडा पदवीधर मतदारसंघ; शिवसेनेकडून दिलीप घुगे यांचा अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
marathwada-graduate-constituency-mlc-election-shiv-sena-candidate-dilip-ghuge-files-nomination-chhatrapati-sambhaji-nagar

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीने दिलीप घुगे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी हिंगोली येथील दिलीप घुगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज सकाळी क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांच्यासमवेत शिवसेना नेते चंद्रकांत खैर, शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार प्रवीण स्वामी, उपनेते सुभाष पाटील हे यावेळी उपस्थित होते.

ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाच्या कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवन येथे पार पडली. या बैठकीत हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित आणि ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त करण्यात येणाऱया कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला अध्यक्ष चंद्रकांत कोपडे, कार्याध्यक्ष राजन चांदोरकर, उपाध्यक्ष आप्पा चव्हाण, सरचिटणीस रामदास पारकर, खजिनदार शिवाजी गावडे, सहचिटणीस प्रभाकर शिरोडकर, सहखजिनदार विलास गुप्ते, सहकार्यालय प्रमुख कृष्णकांत रोडे, उल्हास पांचाळ उपस्थित होते.