
ऑनलाईन EPF दाव्याचा साधारण 7-10 दिवसांमध्ये निकाल लागतो. या कालावधीमध्ये क्लेम प्रोसेस झाले नाही तर सदस्य EPFiGMS पोर्टलवर याविषयी तक्रार दाखल करू शकतात.
EPFO Grievance पोर्टलवर तक्रार नोंदवा. EPFiGMS (epfigms.gov.in) वेबसाइटला भेट द्या. तुमचा UAN आणि
कॅप्चा कोड टाकून ओटीपी (OTP) मिळवा
‘Grievance Officer’ कडे तुमची तक्रार नोंदवा. तुमचा क्लेम स्टेटसचा स्क्रीनशॉट अपलोड करा आणि सबमिट करा. तुमच्या Employer शी संपर्क साधा.
तुमच्या कंपनीच्या HR किंवा फायनान्स टीमशी बोलून तुमचे केवायसी (KYC) किंवा क्लेम त्यांच्या बाजूने मंजूर झाला आहे की नाही याची खात्री करा.
तुमच्या मोबाईलमध्ये UMANG App डाऊनलोड करून त्यात EPFO सेवा निवडून ‘Track Claim’ पर्यायाद्वारे क्लेमची सद्यस्थिती तपासू शकता.































































