ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील इंडिया आघाडीच्या महामोर्चाला मोठा प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी भाजप निवडणूक जिंकण्यासाठी वेळोवेळी काम केले आहे हे आता सिद्ध झाले आहे. ज्ञानेश कुमार यांनी मनमानी कारभार करत गैरपद्धतीने एसआयआर मोहीम राबवली आहे. जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाही, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल, असे ठाम प्रतिपादन खासदार रवींद्र चव्हाण यांनी महामोर्चा दरम्यान केले.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह एसआयआर रद्द करा व निवडणूका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे घ्या या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), सीपीआय, आम आदमी पार्टीसह इंडिया आघाडीच्या वतीने आज शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान महामोर्चा काढण्यात आला. यावेळी खा. रवींद्र चव्हाण हे बोलत होते. ज्ञानेश कुमार हटावो, लोकशाही बचावो अशी प्रचंड घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या महामोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला.