Nana Patekar नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गुरुवारी पहाटे ते गोव्यातील निवासस्थानी बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

गुरुवारी पहाटे नाना यांना त्यांच्या गोव्यातील निवासस्थानी छातीत दुखू लागल्याने डॉक्टरांना बोलवण्यात आले होते. मात्र तोपर्यंत ते बेशुद्ध झाले होते, त्यामुळे त्यांना कार्डिअॅक मसाज देण्यात आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात पोहचण्याआधीच नानांचा मृत्यू झाला होता.

नाना पाटेकर यांनी जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून शिक्षण घेतल्यानंतर व्यावसायिक जाहिरात क्षेत्रात काम केले. अभिनयाची खरी सुरुवात प्रायोगिक आणि व्यावसायिक मराठी रंगभूमीवरून झाली. ‘हमीदाबाईची कोठी’, ‘पुरुष’ यांसारख्या नाटकांतून त्यांच्या दमदार अभिनयाची चुणूक दिसली. ‘पुरुष’ नाटकातील त्यांची खलनायकी भूमिका विशेष गाजली. १९७८ मध्ये आलेल्या ‘गमन’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.