नाना पाटेकरांचे देशप्रेम! कारगिलच्या युद्धात लष्करासोबत सीमेवर बजावले होते कर्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रहार, क्रांतीवीर अशा चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर आपण नाना पाटेकर यांचे देशप्रेम बघितले होते. मात्र प्रत्यक्षात देखील नाना हे मोठे देशभक्त होते याचा पुरावा म्हणजे कारगिलच्या युद्धात सैन्यासोबत उतरून त्यांनी पाकिस्तानविरोधात दिलेला लढा. 1990 च्या कारगिलच्या युद्धात नाना पाटेकर हे थेट सीमेवर पाकिस्तान विरोधातील लढाईत उतरले होते. त्यासाठी त्यांनी तत्कालिन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची विशेष परवानगी घेतली होती.

1991 मध्ये आलेल्या प्रहार चित्रपटासाठी नाना पाटेकरांनी मराठा लाईट इन्फंट्रीसोबत तीन वर्ष लष्करी प्रशिक्षण घेतलं होतं. ते राष्ट्रीय स्तरावरचे नेमबाजही होते. 1991 मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी त्यांनी सैन्यात सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी तत्कालिन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची भेट घेऊन त्यांना याबाबत कळवले होते. नानांनी घेतलेले लष्करी प्रशिक्षण आणि नेमबाजीचा अनुभव पाहता फर्नांडिस यांनी त्यांची मागणी मान्य केली. त्यानंतर त्यांना क्विक रिस्पॉन्स टीममध्ये सामील करण्यात आले. या काळात नानांनी जम्मू कश्मीरमधील द्रास, कुपवाडा, बारामुल्ला अशा संवेदनशील भागांमध्ये देशासाठी सेवा बजावली होती. नानांनी स्वत: एका हिंदी वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.