
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतर आणि इस्लामला जबाबदार धरले आहे. ‘फ्रान्ससारख्या महान देशावर इस्लामला कब्जा करायचा आहे,’ असा गंभीर दावा ट्रम्प यांनी केला.
फ्रान्समध्ये बाहेर होणारी घुसखोरी तेथील सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यातून हे सगळे घडले आहे. या आंदोलनाशी शाळांचा संबंध नाही. फ्रान्सवर ताबा मिळवण्याचा इस्लामी शक्तींचा हा प्रयत्न आहे, असे ट्रम्प म्हणाले.
फ्रान्सने फेटाळला दावा
फ्रान्स सरकारने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला. ‘फ्रान्समधील घटनांचा अन्वयार्थ लावण्याचा अधिकार अन्य देशांना नाही, असे फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जेन-नोएल बॅरोट यांनी सुनावले.

























































