
‘जनता ही माझ्यासाठी देवासमान आहे. सलग 25 वर्षे माझ्यावर विश्वास दाखवणाऱया देशातील जनतेसमोर मी नतमस्तक आहे,’ अशी कृतज्ञता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना मोदींनी जनतेचे आभार मानले. ‘माझ्या हितचिंतकांमुळे मला प्रोत्साहन मिळाले आणि टीकाकारांनी आत्मपरीक्षण करण्यास शिकवले. देशातील 140 कोटी जनता मिळून 2047 पर्यंत विकसित भारत घडवतील. त्यासाठी प्रत्येकाने आम्ही करून दाखवणारच ही वृत्ती अंगीकारली पाहिजे,’ असे मोदी म्हणाले.
























































