
काही खोडकर मुलींनी खेळता-खेळता एका मांजरीला बळजबरीने उचलून तिला रुग्ण बनऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हा व्हिडीओ बघून असे वाटेल की, मांजरीला काहीतरी गंभीर दुखापत झाली असावी. मुली हा प्रसंग एखाद्या मोठ्या वैद्यकीय संकटाप्रमाणे हाताळतात आणि आणि तिच्यावर उपचार करण्यात गुंतून जातात. हा व्हिडीओ टिकटॉक आणि यूटय़ूबवर मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला आहे. @thesundaily या इन्स्टा आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. मांजर आनंद घेतेय, बिचारा अजूनही विचार करतोय की नक्की काय झालंयं, किती छान अशा कमेंट्स येत आहेत.
























































