निष्पक्ष चौकशीसाठी MPSC अध्यक्षांना पदावरून दूर करा, आदित्य ठाकरे यांची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यमान अध्यक्षांसह इतर सदस्यांविरोधातील तक्रारींची चौकशी सुरू असल्याने, चौकशी पूर्ण होईपर्यंत विद्यमान अध्यक्षांना तत्काळ पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) विद्यमान अध्यक्ष यांच्यासह माजी अध्यक्ष आणि सदस्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे केली असल्याची बातमी समजली. तरी सदर चौकशी होत असताना संबंधित अध्यक्षांनी आपल्या पदावर कार्यरत राहणे हे उचित ठरणार नाही. त्यामुळे सदर चौकशी निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पडण्यासाठी विद्यमान अध्यक्षांना पदावरून काढून टाकण्याची शिफारस राष्ट्रपती महोदयांकडे करण्यात यावी, ही नम्र विनंती.”