
महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, वारकरी संप्रदायाचा आणि पंढरपूरच्या आषाढी वारीचा आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा आता जागतिक स्तरावर गौरवला गेला आहे. माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त निर्मितीतील ‘पंढरपूर वारी-इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाची प्रतिष्ठत ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ या श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे.
इंग्रजी भाषेतील 22 मिनिटांच्या या माहितीपटातून वारकरी संप्रदायाचे वैशिष्टय़, संतपरंपरेचे योगदान आणि वारीमागील आध्यात्मिक विचार प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी दिलेला भक्ती, समता, मानवता आणि बंधुभावाचा संदेश भाषेच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात हा माहितीपट महत्त्वपूर्ण ठरला आहे.


























































