
मालमत्तेची मूळ कागदपत्रे बँकेकडे असतील आणि घर विकताना मालकी हक्काचा पुरावा हवा असेल, तर कोणती कागदपत्रे बँकेकडे आहेत हे तपासा.
मूळ कागदपत्रे बँकेकडे ठेवल्याबद्दल बँक कागदपत्रांची एक यादी आणि पावती देते. ही पावती सिद्ध करते की, मालमत्ता तुमचीच आहे आणि ती सुरक्षितपणे बँकेकडे तारण आहे.
तुम्ही नोंदणी कार्यालयातून नोंदणीपृत विक्री कराराची प्रमाणित प्रतदेखील मिळवू शकता. वेगवेगळ्या राज्यांत ऑनलाईन आणि ऑफलाईनही सुविधा उपलब्ध असते.
विक्रीपत्र, मागील मालकी टायटल किंवा हक्काचे दस्तऐवज, हस्तांतरण किंवा म्युटेशन नोंद, मालमत्ता कराच्या पावत्या, वीज-पाणी बिले, कर्जाची कागदपत्रे जपून ठेवावीत.
तुम्ही सब रजिस्ट्रार कार्यालयातून तुमच्या विक्रीपत्राची अधिपृत प्रत काढू शकता. बिल्डर किंवा विव्रेत्याकडून मिळालेले ताबा पत्रही महत्त्वाचा पुरावा ठरते.































































