गुजरातमधील स्टेडियमनंतर आता… उत्तर प्रदेशमधील विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये असणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यानंतर आता आशियातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशमधील ‘नोएडा’ विमानतळालादेखील मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. हे विमानतळ आता ‘नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ म्हणून ओळखले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अविरत 25 वर्षांच्या शासकीय नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने एक विशेष ठराव मंजूर केला असून त्याअंतर्गतच हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. याबाबत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते देशाचे नेतृत्व करतात ही संपूर्ण राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. राज्यात पायाभूत सुविधा आणि वारसा यांचा समन्वय साधत दुहेरी विकास वेगाने पुढे जात आहे.’