हे सुरांनो चंद्र व्हा… मराठी संगीत रंगभूमीचा सुरेल प्रवास उलगडला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाच्या सांस्पृतिक कार्य विभाग आणि सांस्पृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या नाटय़संगीताच्या सुरेल मैफलीचे आयोजन विलेपार्ले येथे केले होते. केवळ गाण्यांची मैफल न राहता मराठी संगीत रंगभूमीच्या वैभवाची सफर कार्यक्रमातून घडली.

आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या 125 व्या पुण्यतिथीनिमित्त आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त या मैफलीचे आयोजन केले होते. ओंकार प्रभुघाटे, केतकी चैतन्य आणि धनंजय म्हसकर यांनी लोकप्रिय नाटकांतील अविस्मरणीय नाटय़पदांचे सादरीकरण केले. सांस्पृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, सांस्पृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण पुलकर्णी आणि संचालक प्रशांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांची विशेष उपस्थिती होती. निवेदन अनघा मोडक यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन स्वरदा कम्युनिकेशन अॅण्ड इव्हेंट्सने केले.