
यूपीआयवरील दोन हजार रुपयांवरील पेमेंटवर एमडीआर लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार 15 ऑक्टोबर 2026 पासून दोन हजारांवरील जास्तीच्या पेमेंटवर 0.4 टक्के शुल्क आकारणार होते, परंतु आता हा निर्णय 1 जानेवारी 2027 पासून लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या एमडीआरच्या निर्णयाला देशभरातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच आता सणासुदीचा काळ सुरू होत आहे. त्यामुळे लोकांची नाराजी ओढवून न घेता हा निर्णय तात्पुरता पुढे ढकलण्यासाठी हालचाली केंद्रीय स्तरावर सुरू आहेत. सणासुदीच्या काळात दुकानदारांवर अतिरिक्त भार पडू नये यासाठी सरकार 0.4 टक्के मर्चंट शुल्क लागू करण्याची तारीख पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. सरकारचा अधिपृत निर्णय पुढील काही दिवसांत समोर येऊ शकतो.


























































