
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज भेट घेऊन निवेदन दिले. यानंतर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रपतींना आम्ही मतचोरीबद्दल सांगितल्यावर त्यांनी नाकारले नाही. तुम्ही पुरावे द्या असे राष्ट्रपती म्हणाल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
INDIA bloc leaders submitted a memorandum to President Droupadi Murmu in their meeting at the Rashtrapati Bhavan.
“… We have incontrovertible proof that ‘Vote Chori’ has taken place on a massive scale in election after election. Assembly elections in Haryana, Maharashtra, MP, Chhattisgarh, Bihar, Delhi and West Bengal have been stolen. Both the EVMs and the electoral rolls have been completely manipulated by the BJP in several other Assembly and Lok Sabha elections. This is a crime against the nation, and the Chief Election Commissioner has blatantly cheated and lied to the Supreme Court of India to cover up this crime. The Right to Vote is the foundation of representative democracy enshrined in Article 326 of the Indian Constitution. The Election Commission is its constitutional custodian, not its proprietor. He is answerable to the Constitution of India and not to his political masters. No institution can be permitted to alter the rules governing that right, evade accountability for its decisions, and silence those who demand answers through evasion, repression and criminal conduct…” reads the memorandum
— ANI (@ANI) October 9, 2026
मतचोरीचा मुद्दा आम्ही मांडला. ज्ञानेश कुमार यांनी मोठी चूक केली आहे. त्यांच्या ऑफिसमधून सगळ्या गोष्टी चोरी होत आहेत. म्हणून आम्ही मागणी केलीय की पुन्हा EVM हटून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. मतचोरी जिथे-जिथे झाली त्याचे पुरावे राष्ट्रपतींनी मागितले आहेत. ते पुरावे आम्ही गोळा करत आहोत आणि ते राष्ट्रपतींकडे देऊ. मोदी आणि शहा देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रपतींनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. या प्रकरणी संबंधितांशी चर्चा करून तपासणी करून पुढील पाऊल उलले जाईल, असे राष्ट्रपती म्हणाल्या, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. राष्ट्रपती सकारात्मक होत्या. राष्ट्रपतींनी आमच्याकडे मतचोरीचे पुरावे मागितले, असे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी म्हणाल्या.
आम्ही राष्ट्रपतींची भेट घेतली. राष्ट्रपतींना आम्ही मतचोरीबद्दल सांगितल्यावर त्यांनी नाकारले नाही. तुम्ही पुरावे द्या, असे राष्ट्रपती म्हणाल्या. आम्ही मतचोरीचे पुरावे राष्ट्रपतींना देणार आहोत. देशाला माहिती, विद्यार्थ्यांना माहिती आहे. देशात मतचोरी होते. नरेंद्र मोदी त्याचे ‘शिल्पकार’ आहेत. अमित शहा, ज्ञानेश कुमार यांनी अंमलबजावणी केली आहे. आणि राष्ट्रपतींनी नाकारले नाही. याबद्दल विचार करून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन राष्ट्रपतींनी दिल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.




























































