सत्ता गमावण्याची भीती असणारेच असे काम करतात; जेवर विमानतळाच्या नामकरणावर अखिलेश यादव यांचा भाजपला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने जेवरच्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नोएडा-जेवर’ असे ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

ज्यांना सत्ता गमावण्याची भीती असते, पद जाण्याची चिंता असेत, ते अशाप्रकारे नामकरण करत ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या डबल-इंजिन सरकारला जनतेची काळी नाही, ते फक्त नामकरण करत आहे, असे अखिलेश म्हणाले.

ज्यांना सत्ता जाण्याची भीती आहे, ते केवळ स्मरणात राहण्यासाठी त्यांना नाव कायम ठेवायचे आहे. त्यांचे पंतप्रधानपद जाणार असल्याने हे नामांतर केले जात आहे, असे ते म्हणाले. डबल-इंजिन सरकारला जनतेप्रति कोणतीही जबाबदारी नाही, असे म्हणत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.