पृथ्वी लालबुंद झाली, समुद्रही तापला… जगावर ‘सुपर-डुपर एल निनो’चे संकट; ऋतूचक्र विस्कळीत होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील हवामान तज्ज्ञांनी एल निनोच्या तीव्र होत चाललेल्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. यंदा एल निनोची स्थिती अत्यंत तीव्र होण्याची शक्यता असून या नैसर्गिक हवामान प्रक्रियेमुळे जगातील अनेक भागांमध्ये नेहमीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होऊ शकते. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, यंदाचा एल निनो हा 1950 नंतरच्या सर्वाधिक तीव्र ठरू शकतो. यामुळे जगभरातील ऋतुचक्र विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढणे आणि महासागरात साठलेली उष्णता वातावरणात मुक्त होणे ही एल निनोच्या प्रभावातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. या बदलांचा परिणाम केवळ प्रशांत महासागराच्या आसपासच्या प्रदेशांपुरता मर्यादित राहत नाही, तर जगभरातील तापमान, पर्जन्यमान आणि ऋतुचक्रावर होतो. त्यामुळे आगामी काही महिन्यांत पृथ्वीच्या मोठ्या भूभागाला उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागू शकतो.