
सत्ताधाऱ्यांनी आमच्या कुटुंबात स्वतःच्या स्वार्थासाठी भांडणे लावली. उद्या तुमच्या कुटुंबातही लावतील, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर नाव न घेता टीकेचा प्रहार केला. कुटुंबात तसेच भावाभावात भांडणे लावणाऱ्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कांबा येथील मोनालिसा हॉल मध्ये राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, या देशातील महिला सुरक्षित नाहीत. लाडकी बहीण योजना राबवून राज्यातील महिलांचीच फसवणूक केली आहे. २०२९ मध्ये महिला आरक्षण दिले नाही तर लोकसभेत सवाल विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मेळाव्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष डॉ. रुपाली कराळे उपस्थित होते.


























































