कुसल मेंडिस श्रीलंकेचा कसोटी कर्णधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकेचा कसोटी कर्णधार धनंजय डि’सिल्व्हाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी श्रीलंका क्रिकेट संघटनेने कुसल मेंडिसची त्याच्या जागी नियुक्ती केली आहे. मेंडिसने यापूर्वी व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे आणि आता तो कसोटी क्रिकेटमध्येही संघाचे नेतृत्व करेल. डि’सिल्व्हाने अचानक कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याने श्रीलंका क्रिकेटला पत्र लिहून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आणि म्हटले की, आता पुढच्या पिढीने कर्णधारपद स्वीकारले पाहिजे. त्याच्या राजीनाम्यानंतर मंडळाने मेंडिसची नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.