
शरीरात ‘वातदोष’ वाढल्यामुळे आतड्यांमधील मल सुकतो. त्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत. दीर्घकाळ समस्या राहिल्यास मूळव्याध, आतडय़ांना सूज यांसारख्या अशा समस्या उद्भवू शकतात.
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी रोज एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या. पाणी किंवा दुधात भिजवलेले मनुके व अंजीर सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.
कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने पचनसंस्था सक्रिय होते. फळे, डाळी आणि पालेभाज्या खा. पुरेसे पाणी प्या. चालणे किंवा नियमित व्यायाम करा.



























































