पॅरा नेमबाजपटूंचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई पॅरा गेम्ससाठीच्या हिंदुस्थानच्या पथकाचा निरोप समारंभ गोंधळात पार पडला. अनेक पॅरा शूटर्सनी निवड प्रक्रियेत भ्रष्टाचार आणि अनियमिततेचा आरोप करत क्रीडास्थळाबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी हिंदुस्थानी पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेतली, ज्यांनी त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरीही नेमबाजांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आणि घोषणाबाजी केली.