मूल होत नाही म्हणून पतीने दिली दुसऱ्या लग्नाची धमकी, पत्नीने त्याचे गुप्तांगच कापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील जैद गार्डन परिसरात राहणाऱ्या नदीम नावाच्या तरुणावर त्याच्याच पत्नी शबानाने प्राणघातक हल्ला करत धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या नदीमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नदीम आणि शबाना यांच्या लग्नाला सात वर्ष झाली होती तरीही त्यांना मूलबाळ नव्हते. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत असत. नदीम शबानाला वारंवार दुसऱ्या लग्नाची धमकी देत होता.

नदीमच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाना इतर अनोळखी तरुणांशी फोनवर बोलत असे आणि या गोष्टीला नदीमला रागा यायचा. त्यावरून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. बुधवारी रात्रीही मूल न होण्याच्या व शबानाच्या इतर तरुणांसोबतच्या बोलण्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते.

भांडण मिटल्यानंतर काही वेळाने शबानाने नदीमला कॉफी बनवून दिली. नदीमच्या आरोपानुसार, कॉफी प्यायल्यानंतर त्याला चक्कर येऊ लागली आणि तो बेशुद्ध झाला. पती बेशुद्ध पडल्याचे पाहताच शबानाने घरातील धारदार चाकूने त्याच्या गुप्तांगावर वार करून ते कापून काढले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नदीमला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शबानाविरोधात गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे.