
निवडणुकांत होणारी मतचोरी आणि एसआयआरच्या माध्यमातून सुरू असलेल्या मतदार यादीतील घोटाळय़ाच्या विरोधात देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्यात यावे यासाठी इंडिया आघाडीसह विविध संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत. उद्या 10 ऑक्टोबर रोजी जंतर मंतरवर होत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या आदेशावरून पोलिसांकडून दिल्लीत चौफेर नाकेबंदी करण्यात आली आहे. दिल्लीतील सर्व 57 मेट्रो स्थानकांतील प्रवेशावर बंदी घालण्यात आली असून दिल्लीला येणाऱया 37 रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तर 24 तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असून शाळा-कॉलेजचे वर्गही ऑनलाइन होणार आहेत.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या अभिजित दीपके यांच्या नेतृत्वातील कॉक्रोच जनता पार्टीने ‘चलो दिल्ली’चा नारा देत जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा दिला आहे. दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी दीपके व त्यांच्या टीमने कोणत्याही परिस्थितीत जंतर मंतरवर जाणाराच आणि आंदोलन करणारच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि दिल्ली पोलिसांनी हे आंदोलन यशस्वी होऊ नये यासाठी खबरदारीच्या सर्व त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. देशभरातून दिल्लीकडे निघालेल्या आंदोलकांची वाटेतच गाडय़ा थांबवून धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. यात पुण्यातील 21 जणांना मध्य प्रदेशात रोखून ताब्यात घेण्यात आले.
38 हजार जवानांची फौज तैनात
दिल्लीत जवळपास 38,000 जवानांची फौज तैनात करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या अंदाजे 221 कंपन्या म्हणजे जवळपास 25,000 सीएपीएफ जवान तैनात आहेत. याशिवाय दिल्ली पोलिसांचे सुमारे 13,000 अधिकारी व ज

























































