
राज्यातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत आणखी 18 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने आज जारी केला. या तालुक्यांतील प्रमुख पाच पिकांचे 20 टक्के सर्वेक्षण करण्यात येणार आहे. उपग्रह छायाचित्रे व संगणकीय माहितीची प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थितीशी पडताळणी केली जाणार आहे. यामुळे दुष्काळाच्या तीव्रतेचे वास्तव चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
नांदेड – मुदखेड, मुखेड, चंद्रपूर – जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, गोंदिया – आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया, वर्धा – कारंजा, भंडारा – मोहाडी, तुमसर, नाशिक – त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड, सातारा – पाटण, सांगली – शिराळा, वाळवा.




























































