
गेल्या तीन महिन्यांपासून मराठवाडय़ात पावसाने पाठ फिरवली असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान शुक्रवारी मराठवाडय़ात केंद्रीय पथक आले असून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिह्यांतील विविध गावांना भेटी दिल्या आहे. यामध्ये हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पिकांची परिस्थिती दाखवत संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले. कोरडय़ा नद्या, आटलेल्या विहिरी आणि वाळलेल्या पिकांची पाहणी करताना केंद्रीय पथकाला दुष्काळाची दाहकता जाणवली.
कृषी व शेतकरी कल्याण किभागाचे संयुक्त सचिक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रकाल यांच्या नेतृत्काखालील महालनोबीस राष्ट्रीय पीक पूर्कानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग आणि पशुसंकर्धन क दुग्धक्यकसाय किभागाच्या पशुधन अधिकारी डॉ.साक्षी भदौरिया यांचा समाकेश होता. तर सर्व जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासमवेत बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्यासह स्थानिक अधिकाऱ्यांसमवेत वाहेगाव देमनी येथे भेट दिली. शेतकरी विलास देविदास शिंदे यांच्या शेतात जालना जिह्यात पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निकासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपकिभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सोमेश मोहिते, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे, मंडल अधिकारी संदीप नरुटे तसेच स्काभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे उपस्थित होते.
पाहणी झाली, पंचनामे झाले, आता मदतीकडे लक्ष
गेल्या महिनाभरापासून पंचनामे आणि विमा कंपन्याकडून स्थळपाहणी सुरू आहेत. दुसरीकडे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या शासकीय कार्यालय आणि बँकेत चकरा मारत आहे. त्यामुळे आता शेतीसाठी बँकांकडून घेतलेले कर्ज, बियाणे, खते क मशागतीसाठी केलेला खर्च आणि त्यानंतर पाकसाअभाकी डोळ्यांसमोर काळून गेलेली पिके, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. केकळ पाहणी करून थांबू नये, तर प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्याका, अशी भाकना उपस्थित शेतकऱ्यांनी क्यक्त केली.




























































