ही तर अघोषित आणीबाणी! दिल्लीतील निर्बंधांवरून आदित्य ठाकरेंचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील आंदोलनांवर सरकारने घातलेल्या निर्बंधांबद्दल आज संताप व्यक्त केला. ही तर अघोषित आणीबाणीच आहे, फक्त भाजप सरकारला ते नाव घेण्यास भीती वाटते, अशी टीका त्यांनी केली.

कॉक्रोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबरला जंतर मंतरवर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी आज यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली. जंतरमंतरवर होणाऱया आंदोलनापूर्वीच सरकारने ‘नाव न घेता आणीबाणी’ लादल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई आणि महाराष्ट्राची यांना भीती आहे, लोकांना ताब्यात घेत आहेत, नोटिसा पाठवत आहे. ख्रया लोकशाहीला घाबरणाऱया हुकूमशाही राजवटीच्या तावडीतून नागरिक हिंदुस्थानची लोकशाही कशी परत मिळवत आहेत, हे संपूर्ण जग पाहत आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.