
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 12 ऑक्टोबर 2026 आहे. नवमतदारांसह प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी 10 व 11 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ घेऊन मतदारांनी अंतिम मतदार यादीत आपले नाव सुनिश्चित करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.




























































