
सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी इराणसमर्थित हुथी बंडखोरांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला असून, 300 हून अधिक जखमी झाल्याचे झाले आहेत. मृतांमध्ये एका अमेरिकन नागरिकाचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर विमानतळावरील विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या विमानाच्या वेळापत्रकाची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रियाध विमानतळावर आठवड्याभरात झालेला हा तिसरा हल्ला आहे. त्यामुळे सौदी अरेबियामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विमानतळ परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सौदी अरेबियाचे चार नागरिक, बांगलादेशचे दोन नागरिक आणि अमेरिका, जॉर्डन, पॅलेस्टाईन, सीरिया, सुदान व इजिप्त या देशांतील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या 309 वर पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
विमानतळावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. टर्मिनल क्रमांक 3 च्या परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची तसेच काही काळ धुराचे लोट दिसल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडीओमध्ये विमानतळाच्या टर्मिनलमधील धूळ आणि मलबा पसरल्याचे दिसत आहे.
🇸🇦🇺🇸A US citizen is DEAD after Saudi airport attack
12 lives lost, over 300 wounded and counting…
King Khalid Airport in Riyadh is in total CARNAGE.
Officials insist the conflict is “contained,” while ballistic missiles flatten civilian departure lounges and KILL travelers from nine other nations.
This isn’t distant crossfire anymore, it’s a full-scale international inferno.
Writer: Bri
https://t.co/eBvPg9qvO0— Mario Nawfal (@MarioNawfal) October 10, 2026
दरम्यान, या हल्ल्यानंतर किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कामकाज तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय सौदी नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने घेतला. विमानतळावरील नुकसानीचे मूल्यांकन आणि सुरक्षेची तपासणी पूर्ण होईपर्यंत विमानसेवा रोखण्यात आली आहे. या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरही परिणाम झाला. रियाधकडे जाणारी काही विमाने अन्य विमानतळांकडे वळवण्यात आली, तर काही विमानांना पुन्हा माघारी फिरावे लागले.
























































